Sitkari Pranayam: सित्कारी प्राणायम म्हणजे काय? जाणून घ्या याचे अद्भुत परिणाम; दक्षता, कृती आणि फायदे.

Sitkari Pranayam: योगशास्त्रात श्वसनाला फार महत्त्व दिले आहे. सर्व प्रकारच्या प्राणायमांमध्ये नाकानेच श्वास घेणे व सोडणे क्रिया सांगितली आहे. नाकाच्या नैसर्गिक रचनेमुळे आत जाणारी हवा शुद्ध आणि गाळलेली आणि किंचित उष्ण होते. त्यामुळे फुफ्फुसांवर थेट थंड हवेचा परिणाम होत नाही. ही निसर्गाने दिलेली एक अतिशय सुंदर व्यवस्था आहे.

परंतु योगशास्त्रात तोंडाने श्वास घेऊन केले जाणारे प्राणायम फक्त दोनच सांगितले आहेत; सित्कारी प्राणायम आणि शीतली प्राणायम. या दोन प्राणायमांचा उपयोग शरीराला थंडावा देण्यासाठी केला जातो. या लेखात आपण सित्कारी प्राणायमाची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

सित्कारी प्राणायम म्हणजे काय?

सित्कारी प्राणायमा (Sitkari Pranayam) मध्ये आपल्या शिरीरात तोंडाने श्वास घेणे (पूरक) आणि नाकाने श्वास सोडणे (रेचक) केले जाते. पूरक करताना तोंडाद्वारे सी…सी असा विशिष्ट आवाज होतो.

या होणाऱ्या आवाजामुळेच या प्राणायमाला सित्कारी प्राणायम असे नाव पडले आहे. तोंडातून घेतलेली हवा थंड असल्यामुळे शरीरावर थंड परिणाम होतो. शरीरातील उष्णतेमुळे होणारे विकार, पित्तदोष यावर हा प्राणायम विशेष उपयुक्त मानला जातो.

तोंडाने श्वास घेण्यामागील कारण

सामान्यत: तोंडाने श्वास घेणे योग्य मानले जात नाही; कारण तोंडातून थेट थंड, कोरडी व न गाळलेली हवा आत जाते. त्यामुळे घसा, स्वरयंत्र आणि फुफुसावर दुष्परिणाम होऊ शकतात. सतत तोंडाने श्वास घेतल्यास घशाचे विकार, खोकला, सर्दी यासारख्या कायमच्या समस्या उद्भवू शकतात.

योगाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती, म्हणूनच शरीराला थंड परिणामाची आवश्यकता वाटल्यास आणि फक्त काही मर्यादित काळासाठीच सित्कारी प्राणायम करण्याची परवानगी दिली आहे.

सित्कारी प्राणायमाची पूर्वतयारी

हा प्राणायम (Sitkari Pranayam) करण्यापूर्वी आपले शरीर व मन शांत असणे आवश्यक आहे. कोणत्याही योग्य आशा एका आसनात म्हणजे पद्मासन, सिद्धासन, वज्रासन, स्वस्तिक आसनामध्ये बसावे.

बसण्याची पद्धत: आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवा, मान सरळ ठेवा. डोळे समोर स्थिर करून हळूच बंद करावेत, शरीर पूर्णपणे स्थिर ठेवावे, मन शांत करून लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित करावे.

Read Also  Suryabhedan Pranayam: तुमचे तारुण्य वाढवायचे असेल तर रोज करा सूर्यभेदन प्राणायाम; महत्व आणि फायदे काय आहेत? जाणून घ्या इथे.

सित्कारी प्राणायम कसा करावा.

कोणत्याही योग्य आशा एका आसनात बसल्यानंतर, दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा करून दोन्ही हात आपल्या गुडघ्या वरती ठेवावेत. पुढील प्रमाणे क्रिया करावी. Sitkari Pranayam

  1. आपले दात एकमेकांवर घट्ट बंद करून तोंड थोडे उघडावे.
  2. दाताच्या आतल्या, बाजूस दात टेकवल्या ठिकाणी आतून जिभेचे टोक टेकावा. जिभेच्या सहाय्याने दातांची फट बंद होईल.
  3. आता दातांच्या फटीतून वेगाने श्वास आत घ्या (पूरक) यावेळी सी…सी असा आवाज होईल, तोंडाने घेतलेली हवा थंड असल्यामुळे शरीरावर थंडावा जाणवेल
  4. पूरक झाल्यानंतर प्रणव मुद्रा करून आपल्या दोन्ही नाकपुड्या बंद करा. त्यानंतर सर्वप्रथम जालंदरबंध, नंतर मूलबंध शेवटी उड्डियानबंध लावा. आपल्या श्वासनाच्या क्षमतेनुसार कुंभक करा. सहनशक्तीच्या पुढे कुंभक करू नये.
  5. श्वास सोडताना (रेचक) प्रथम उड्डियानबंध सोडा नंतर मूलबंध सोडा शेवटी जालंधरबंध सोडा.
  6. प्रणव मुद्रा सोडून दोन्ही नाकपुड्यातून शांतपणे रेचक करा.
  7. रेचक करताना पोट व श्वसन स्नायू सैल ठेवा
  8. छातीतील सर्व हवा बाहेर गेल्यावर दुसरे आवर्तन सुरू करा.
Sitkari Pranayam
Sitkari Pranayam

सित्कारी प्राणायमाचे फायदे

सित्कारी प्राणायमाचा नियमित आणि योग्य पद्धतीने अभ्यास केल्यास शरीरावर व मनावर अनेक सकारात्मक परिणाम होतात. शरीर मजबूत व सुदृढ बनते. दीर्घकाळ अभ्यास केल्याने साधकाला तारुण्याचा अनुभव येतो. शरीरात ताकत वाढते, ऊर्जा वाढते भूक व तहान कमी लागते. वाढलेल्या रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

उष्णतेमुळे होणारे विकार जसे की पित्तदोष, आम्लता, अंगाची जळजळ कमी होते. चेहऱ्यावरील सौंदर्य वाढते, चेहरा तेजस्वी व प्रसन्न दिसू लागतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मन शांत व आनंदी राहते. आळस, चिडचिड कमी होण्यास मदत होते.

प्राणायम करताना घ्यावयाची काळजी

हा प्राणायम तोंडाने श्वास घेऊन केला जात असल्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. बाहेरील हवा दूषित असेल तर हा प्राणायम करू नये. तोंडाने हवा घेतल्यामुळे श्वसन संस्थेचा धोका वाढू शकतो.

Read Also  Marjarasan benefits: फक्त १ मिनिटांचा सराव, पाठीचा कणा बनेल लवचिक आणि मजबूत; जाणून घ्या 'या' आसनाचे आश्चर्यकारक फायदे.

हिवाळ्यात किंवा थंड वातावरणात हा प्राणायम टाळावा. हृदयविकार, उच्च किंवा कमी रक्तदाब, सर्दी, खोकला, दमा, सायटिका असेल तर हा प्राणायम टाळावा. हा प्राणायम नेहमी तज्ञ योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करावा.

Sitkari Pranayam

सित्कारी प्राणायम हा शरीराला थंडावा देणारा एक प्रभावी प्राणायम म्हणून ओळखला जातो. उष्णतेचे विकार, पित्त दोष व आम्लता सारख्या समस्यांमध्ये तो विशेष फायदेशीर ठरतो.

मात्र तोंडाने श्वास घेण्याची पद्धत असल्यामुळे योग्य काळ योग्य वातावरण आणि योग्य आरोग्य स्थिती यांचा विचार करूनच हा प्राणायम करणे अत्यंत आवश्यक आहे. हा प्राणायम नियमित संयमित व योग्य पद्धतीने केल्यास शरीर, मन व आरोग्य यांना संतुलित ठेवण्यास नक्कीच मदत करतो.

WhatsApp Group join link Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top