Suryabhedan Pranayam: तुमचे तारुण्य वाढवायचे असेल तर रोज करा सूर्यभेदन प्राणायाम; महत्व आणि फायदे काय आहेत? जाणून घ्या इथे.

Suryabhedan Pranayam: सूर्यभेदन प्राणायाम हा हटयोग परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा, शक्तिशाली आणि ऊर्जादायी प्राणायाम प्रकार मानला जातो. “सूर्य” म्हणजे उष्णता, तेज आणि सक्रियता दर्शवणारा घटक तर “भेदन” म्हणजे जागृत करणे, प्रवाहित करणे किंवा सक्रियपणे भेदून पुढे जाणे.

या प्राणायमात उजव्या नासिकेने श्वास घेतला जातो आणि डाव्या नासिकेने श्वास सोडला जातो, ज्यामुळे पिंगला नाडी सक्रिय होते आणि आपल्या शरीरातील उष्ण उर्जेचा प्रवाह वाढतो. यामुळे शरीरात स्फूर्ती, चैतन्य आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. हा प्राणायाम विशेषता शरीरातील जडत्व, आळस, थंडीची प्रवृत्ती, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि वातदोष कमी करण्यासाठी उपयुक्त मानला जातो.

या (Suryabhedan Pranayam) प्राणायमाचा नियमित सराव केल्यास शरीरात उष्णता वाढून चयापचय यंत्रणा सुधारते, मानसिक उत्साह वाढतो आणि शारीरिक सुदृढता निर्माण होऊन आपल्या तारुण्याचा काळ वाढतो.

सूर्यभेदन प्राणायाम म्हणजे काय?

योगशास्त्रानुसार उजवी नाडी म्हणजे सूर्यनाडी (पिंगला) ही अग्नी आणि उष्णतेशी संबंधित आहे; तर डावी नाडी म्हणजे चंद्रनाडी (इडा) ही शीतलता, शांतता आणि मानसिक स्थैर्याशी संबंधित मानली जाते.

Suryabhedan Pranayam
Suryabhedan Pranayam

सूर्यभेदन प्राणायमात उजव्या नाकपुडीतून श्वास घेणे (पूरक) आणि डाव्या नाकपुडीतून श्वास सोडणे (रेचक) अशी विशिष्ट श्वसन पद्धती वापरली जाते. या संतुलित प्रक्रियेमुळे शरीरातील ऊर्जा प्रवाह नियंत्रित आणि संतुलित राहतो.

ग्रंथातील उल्लेख

असने सुखदे योगी बदध्वा चैवासानं तत:|दक्षनाड्या समाकृष्य बहिस्थ पवनं शनै।। ४८-२.प्र।। ह: आकेशादानखाग्रच्च निरोधावधी कुम्भयेत। तत।।: शनै सव्यनाड्या रेचयेत पवनं शनै: ह ४९-२.प्र.।। कपालशोधनं वातदोषघ्नं कृमिदोषहत पुन।।५०.२.प्र. पुनरिदं कार्य सूर्यभेदन मुत्वंमम।। ह:

हटयोग ग्रंथामध्ये सूर्यभेदन प्राणायामाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. नियमित आणि दीर्घकालीन अभ्यास केल्याने कपाल शुद्धी होते. वातदोष कमी होतो, पोटातील कृमींचा नाश होतो, शरीरातील अग्नी (पचनशक्ती) प्रदीप्त होतो. कुंडलिनी शक्ती जागृत होण्यास मदत होते.

या Suryabhedan Pranayam चे ग्रंथांमध्ये असेही वर्णन आहे की सतत आणि योग्य पद्धतीने अभ्यास केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वार्धक्य कमी होण्यास मदत होते.

Read Also  Yoga Benefits in Marathi: धावपळीच्या जीवनात योग का आवश्यक आहे? काय आहे निरोगी जीवनाची गुरुकिल्ली, जाणून घ्या!

सूर्यभेदन प्राणायाम करण्याची योग्य पद्धत.

  1. सूर्यभेदन प्राणायाम: करण्यासाठी कोणत्याही एका आरामदायक, ध्यानात्मक आसनामद्धे म्हणजेच पद्मासन, सिद्धासन, स्वस्तिकआसन, वज्रासन पैकी एका मध्ये बसा. पाठीचा कणा पूर्ण ताठ ठेवा.
  2. हस्त मुद्रा: उजव्या हाताची प्रणवमुद्रा करून आपल्या ओठांवर ठेवा आणि डोळे हलकेच मिटा.
  3. आपल्या उजव्या हाताच्या करंगळी किंवा अनामिका बोटाने डावी नासिका बंद करा.
  4. पूरक (श्वास घेणे): उजव्या नासिकेने सावकाश दीर्घ श्वास घ्या.
  5. कुंभक (श्वास रोखणे): श्वास घेतल्यानंतर प्रथम जालंदरबंध, मूलबंध, उड्डियानबंध लावा आणि शक्य तितकावेळ श्वास रोखा, शरीरात केसांच्या मुळापर्यंत आणि आपल्या नखाच्यापुढे दाब जाणवेल इथपर्यंत कुंभक करा.
  6. रेचक (श्वास सोडणे): श्वास सोडताना बंध क्रमा क्रमाने सोडा. प्रथम उड्डियानबंध, मूलबंध, जालंदरबंध. मान सरळ करून डाव्या नाकपुडीतून हळूहळू पुरकापेक्षा दुप्पट कालावधीत श्वास सोडा.

ही एक आवृत्ती झाली, अशाच प्रकारे पुढील आवृत्ती करा. या प्राणायमाचा सराव दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी किमान पंधरा मिनिटे करा. सुरुवातीचा सराव कमी वेळ करून हळूहळू कालावधी वाढवा.

सूर्य भेदन प्राणायामाचे फायदे

पचनशक्ती वाढवते: हा उष्ण प्राणायाम असल्याने जठराग्नि प्रद्युप्त होतो, अन्नाचे पचन आणि शोषण सुधारते.

वजन नियंत्रणात मदन: पचन सुधारल्याने आणि शरीरातील चयापचय वाढल्याने वजन कमी करण्यास सहाय्य होते.

पोटातील कृमींचा नाश: आतड्यातील जंतू कमी करण्यासाठी उपयुक्त मानला जातो.

वातदोष कमी करतो: वातप्रकृती असलेल्या व्यक्तींना विशेष लाभदायक.

मेंदू आणि इंद्रिय शुद्धी: मेंदू, पिटीट्यूरी ग्रंथी, डोळे, कान आणि कंठ प्रदेश शुद्ध होण्यास मदत होते आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते.

कुंडली जागृती सहाय्य: नियमित आणि शिस्तबद्ध अभ्यास केल्यास कुंडलिनी शक्ती जागृत करण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढ: या प्राणायामच्या दीर्घकालीन अभ्यासाने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि वार्धक्याचा वेग कमी होतो.

Suryabhedan Pranayam
Suryabhedan Pranayam

सूर्यभेदन प्राणायाम कोणी टाळावा

हा Suryabhedan Pranayam प्राणायाम उच्च रक्तदाब, पित्त प्रकृती जास्त असलेली व्यक्ती, fufusancheाम उच्च रक्तदाब, पित्त प्रकृती जास्त असलेली व्यक्ती, फुफुसांचे विकार, ताप किंवा शरीरात आधीच जास्त उष्णता असल्यास हा प्राणायाम करू नये आणि तज्ञ योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच याचा सराव करावा.

Read Also  Morning Yoga Routine for Beginners: दररोज सकाळी रिकाम्या पोटी योग साधना करण्याचे पाच फायदे काय आहेत? जाणून घ्या.

Suryabhedan Pranayam

सूर्यभेदन प्राणायाम हा शरीरातील उष्णता वाढवणारा, पचन सुधारणारा आणि ऊर्जा देणारा प्रभावी प्राणायाम आहे. योग्य पद्धतीने नियमित आणि संयमाने हा प्राणायाम केल्यास तो शारीरिक तसेच मानसिक आरोग्यास मोठा फायदा देतो.

मात्र हा उष्ण प्रवृत्तीचा प्राणायाम असल्याने सर्वांनीच तो करणे योग्य नाही. आपल्या प्रकृतीनुसार आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला तर त्याचे सर्वोत्तम परिणाम अनुभवता येतात.

WhatsApp Group join link Join Now

Leave a Comment