Chandrabhedan Pranayam |मानसिक शांतता आणि शरीराला थंडावा देणारा प्रभावी योगाभ्यास; जाणून घ्या चंद्रभेदन प्राणायाम काय आहे.

Chandrabhedan Pranayam: चंद्रभेदन प्राणायाम हा शरीर आणि मनाला शांती देणारा, थंड, प्रभाव निर्माण करणारा एक अत्यंत उपयुक्त प्राणायाम प्रकार आहे. योगशास्त्रानुसार आपल्या शरीरात दोन नाड्या मानल्या जातात; इडा नाडी (चंद्र नाडी) आणि पिंगला नाडी (सूर्यनाडी). या प्राणायमामध्ये डाव्या नाकपुडीने श्वास घेणे, म्हणजे चंद्रनाडी सक्रिय करणे अपेक्षित आहे. त्यामुळे या प्राणायमाला चंद्रभेदन असे म्हणतात.

जरी अनेक पारंपारिक ग्रंथामध्ये सूर्य भेदनाचा उल्लेख आढळत असला तरी चंद्रभेदन प्राणायाम सराव परंपरेतून पुढे आला असून त्याचे शारीरिक आणि मानसिक फायदे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

Chandrabhedan Pranayam
Chandrabhedan Pranayam

चंद्रभेदन प्राणायाम म्हणजे काय?

“चंद्र” म्हणजे शीतलता, शांतता आणि स्थैर्य. “भेदन” म्हणजे आरपार जाणे किंवा सक्रिय करणे, त्यामुळे डाव्या नाकपुडीतून श्वास घेऊन (चंद्र नाडी) सक्रिय करणे म्हणजेच चंद्रभेदन प्राणायाम होय. हा प्राणायाम शरीरावर थंड परिणाम करणारा आहे. उन्हाळ्यात, मानसिक ताण-तणावात किंवा शरीरातील उष्णतेच्या विकारांमध्ये हा चंद्रभेदन प्राणायाम विशेष उपयुक्त ठरतो.

पूर्वस्थिती

चंद्रभेदन प्राणायाम करण्यापूर्वी योग्य असे आसन आणि मानसिक तयारी अत्यावश्यक आहे. त्यासाठी पद्मासन, सिद्धासन, वज्रासन, सुखासन यापैकी कोणत्याही आसनामद्धे स्वस्थ बसा पाठीचा कणा सरळ ठेवा. खांदे सैल सोडा. डोळे अलगद बंद करा. शरीर स्थिर आणि मन शांत ठेवा. काही क्षण नैसर्गिक श्वसन चालू ठेवा.

चंद्रभेदन प्राणायाम करण्याची कृती

Chandrabhedan Pranayam सर्व प्रथम उजव्या हाताची हस्त मुद्रा (विश्वमुद्रा) करून अंगठ्याने आपली उजवी नाकपुडी बंद करा.

  1. पूरक (श्वास घेणे): डाव्या नाकपुडीतून हळूहळू संत आणि दीर्घ श्वास घ्या.
  2. कुंभक (श्वास रोखणे): दोन्ही नाकपुड्या बंद करा. प्रथम जालंदरबंध, त्यानंतर मूलबंध आणि उड्डियानबंध लावा. सावकाश आपल्या क्षमतेनुसार श्वास रोखून ठेवा.
  3. रेचक (श्वास सोडणे): बंध सोडताना क्रम पाळा प्रथम उड्डियानबंध सोडा नंतर मूलबंध आणि त्यानंतर जालंदर बंध सोडा. डावी नाकपुडी बंद ठेवून उजव्या नाकपुडीतून हळूहळू श्वास सोडा.
Read Also  Patanjali Yoga Sutra: ऋषी पतंजलींचे योगसूत्र; समाधीचे रहस्य आणि अष्टांग योगाची संपूर्ण माहिती.

ही एक आवृत्ती पूर्ण झाल्या नंतर पुन्हा डाव्या नांकपुडीने श्वास घेऊन त्याच पद्धतीने सराव करा. सुरुवातीला पाच ते सात आवृत्ती पुरेशा आहेत.

Chandrabhedan Pranayam
Chandrabhedan Pranayam: हस्त मुद्रा

चंद्रभेदन प्राणायामाचे फायदे

शरीराला थंडावा देतो: हा Chandrabhedan Pranayam प्राणायाम शरीरामद्धे शीतल प्रभाव निर्माण करतो. उन्हाळ्यात किंवा उष्णतेचे विकार असताना अत्यंत लाभदायक ठरतो.

मानसिक तणाव कमी करतो: डाव्या नाडीचा संबंध मनाशी असल्यामुळे हा प्राणायाम मन शांत करतो. चिंता आणि अस्वस्थता कमी करतो.

उच्च रक्तदाबासाठी उपयुक्त: रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हृदयाच्या कार्यावर सकारात्मक परिणाम होतो.

पित्त विकारावर लाभदायक: शरीरातील असणारी जास्त उष्णताआणि आम्लपित्त यासारख्या विकारांमध्ये अत्यंत उपयुक्त आहे.

इडा नाडी शुद्ध होते: योगशास्त्रानुसार इडा नाडी सक्रिय आणि शुद्ध झाल्याने मानसिक संतुलन वाढते.

चंद्रभेदन प्राणायाम करताना घ्यावयाची काळजी

Chandrabhedan Pranayam करत असताना सर्दी, खोकला किंवा कफ असताना हा प्राणायाम करू नये. थंडीच्या दिवसात टाळावा, दमा किंवा गंभीर विकार असणाऱ्यांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावा. चंद्रभेदन आणि सूर्य भेदन प्राणायाम एकाच दिवशी करू नयेत. गर्भवती महिला आणि हृदय विकार असलेले व्यक्तीने डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

चंद्रभेदन प्राणायाम कधी करावा

चंद्रभेदन प्राणायाम सकाळी, रिकाम्या पोटी करावा किंवा संध्याकाळी शांत वातावरणात करावा. उन्हाळ्याच्या दिवसात या प्राणायमाचे विशेष लाभ आहेत.

Chandrabhedan Pranayam

चंद्रभेदन प्राणायाम हा मनशांती, थंडावा व आणि शारीरिक संतुलन देणारा अत्यंत प्रभावी योगाभ्यास आहे. शरीरातील उष्णता कमी करून मानसिक तणाव कमी करण्यासाठी हा उपयुक्त ठरतो. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवणे, पित्त विकार कमी करणे आणि मन स्थिर ठेवणे शक्य होते.

मात्र कोणताही प्राणायाम सुरू करण्यापूर्वी योग्य मार्गदर्शन घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या क्षमतेनुसार आणि नियम पाळून सराव केल्यास चंद्रभेदन प्राणायाम आपल्यासाठी आरोग्यदायी आणि लाभदायी ठरेल.

Table of Contents

WhatsApp Group join link Join Now

Leave a Comment