Bindu Tratak Benefits: त्राटक ही हठयोगातील एक अत्यंत प्रभावी आणि सूक्ष्म साधना आहे. ही साधना मनाची चंचलता कमी करून एकाग्रता वाढवते आणि अंतर्मन स्थिर करण्यास मदत करते. आपले डोळे उघडे ठेऊन, पापण्यांची उघडझाप ना करता ही साधना केली जाते.
प्राचीन योगग्रंथांमध्ये त्राटकाला विशेष स्थान दिलेले आहे. विशेषतः घेरंड संहिता या ग्रंथात महर्षी घेरंड यांनी त्राटकाचे सविस्तर वर्णन केले आहे. संस्कृत श्लोकानुसार –
“क्षणमेषोन्मेषकं त्यक्त्वा सूक्ष्मलक्ष्यं निरीक्षयेत् ।
पतन्ति यावदश्रूणि त्राटकं प्रोच्यते बुधैः॥”
Bindu Tratak Benefits अर्थ – पापण्यांची उघडझाप न करता सूक्ष्म लक्ष्याकडे अश्रू येईपर्यंत एकटक पाहणे म्हणजे त्राटक. ही केवळ डोळ्यांची क्रिया नसून मन, चेतना आणि आत्मशक्ती जागवणारी ध्यानसाधना आहे.
त्राटक म्हणजे काय?
त्राटक म्हणजे एखाद्या वस्तूकडे, बिंदूकडे किंवा ज्योतीकडे काही काळ एकटक पाहणे. ही क्रिया मनाला एका बिंदूवर स्थिर करण्यासाठी केली जाते. मनाची चंचलता कमी करून त्याला एका विषयावर केंद्रित करणे हा याचा मुख्य उद्देश आहे.
एकाच वस्तूकडे काही काळापयंत एकटक पाहणे म्हणजे त्राटक होय, चंचल मनाला आवर घालून मनाची एकाग्रता साधण्यासाठी त्राटक ध्यान हा सर्वोत्तम मार्ग आहे. एकाच विषयावरती मन एकाग्र करण्याची क्षमता त्राटकाणे साधता येते.
नियमित त्राटक केल्याने आत्मशक्ती वाढते, अंतर्मन आणि बाह्यमन यांचे एकरूप होणे सुलभ होते. मनातील विचारांची गर्दी कमी होऊन मन निर्विचार अवस्थेकडे झुकते. ध्यानाच्या उंच टप्प्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्राटक अत्यंत उपयुक्त मानले जाते.
बिंदू त्राटक करण्याची पद्धत
१) तयारी: 6 इंच लांब आणि 6 इंच रुंद पांढरा कागद घ्या. त्याच्या मध्यभागी सुमारे 1 सेंमी व्यासाचा काळा बिंदू काढा.
२) कागदाची मांडणी: तो कागद डोळ्यांच्या समांतर भिंतीवर चिकटवा. किंवा पुठ्ठ्यावर चिकटवून तो स्टूलवर ठेवा.
३) बसण्याची स्थिती: कागदापासून अंदाजे 3 फूट अंतरावर बसा. पाठ सरळ ठेवा, शरीरावर पूर्ण ताठ ठेवा पण ताण नसावा. बसण्यासाठी शांत, एकांत आणि हवेशीर जागा निवडा.
४) त्राटकाची सुरुवात: कोणत्याही ध्यानात्मक आसनामधे बसा, दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा किंवा द्रोणमुद्रा करा आणि समोरील काळ्या बिंदूकडे एकटक पाहण्यास सुरुवात करा. पापण्यांची उघडझाप टाळा. श्वसन संथ ठेवा, डोळ्यांत जळजळ झाल्यास काही क्षण डोळे बंद करा.
५) पुढील टप्पा: पुन्हा डोळे उघडून बिंदूकडे पाहा. पापण्यांची उघडझाप करू नका. काही वेळाने बिंदू तेजस्वी दिसू लागेल. आपले संपूर्ण लक्ष आणि मन समोरील बिंदूवर स्थिर केल्यावर बिंदू तेजस्वी होत असल्याचे आपणास दिसून येईल. मन पूर्णपणे बिंदूवर स्थिर करण्याचा प्रयत्न करा.
६) कालावधी: साधारण 10–15 मिनिटे साधना करा. किंवा डोळ्यातून अश्रू येईपर्यंत करा. ताण असह्य झाल्यास लगेच थांबा. ही साधना महिन्यातून एक किंवा दोन वेळ करा.
७) समाप्ती: 1–2 मिनिटे डोळे बंद करून त्याच स्थितीत काही वेळ बसा. नंतर असनातून सावकाश उठा. डोळ्यांवर थंड पाण्याचा शिडकावा करा.

बिंदू त्राटकाचा कालावधी
बिंदू त्राटकाचा (Bindu Tratak Benefits) खरा कालावधी म्हणजे डोळ्यातून अश्रू येईपर्यंत ही साधना करणे. सुरवातीस डोळ्यातून पाणी नाही आले तरी डोळ्याना ताण येईपर्यंत करा. ताण असहाय्य झाला की अभ्यास थांबवा किंवा सुरुवातीचा सराव 2–3 मिनिटे पुरेसा आहे. आपला अनुभव वाढल्यावर याचा कालावधी वाढवता येतो. पण हे त्राटक 15-20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ करू नये. याचा अतिरेक टाळावा.
त्राटकाचे लाभ
- डोळ्यांची शुद्धी: डोळ्यातून पाणी आल्यामुळे नैसर्गिक स्वच्छता होते. डोळ्यांच्या स्नायूंना योग्य ताण मिळाल्याने तेथील रक्तपुरवठा सुधारतो.
- दृष्टी तीक्ष्ण होते: नियमित साधनेमुळे डोळ्यांची कार्यक्षमता वाढते. दृष्टी तीक्ष्ण होण्यास मदत होते. काही प्रकरणांत चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होऊ शकते.
- मनाची एकाग्रता वाढते: त्राटक ही विद्यार्थ्यांसाठी आणि ध्यानसाधकांसाठी अत्यंत उपयुक्त क्रिया आहे. स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते.
- मानसिक स्थैर्य: मनातील अस्थिरता, तणाव आणि विचारांचा गोंधळ कमी होतो. मन शांत आणि स्थिर बनते.
- आत्मशक्ती जागृत होते: त्राटकामुळे अंतर्मनातील सूक्ष्म शक्ती जागृत होण्यास मदत होते. ध्यानाच्या प्रगत अवस्थेसाठी ही पायाभूत साधना आहे.
त्राटक करताना घ्यावयाची काळजी
- ज्याना दृष्टीदोष किंवा तीव्र डोकेदुखी आहे त्यांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हा अभ्यास करा.
- चष्मा असेल तर चष्मा काढूनच ही साधना करावी.
- अति वेळ करू नये.
- मानसिक विकार असलेल्या व्यक्तींनी ही साधना टाळावी.
- नेहमी रिकाम्या पोटी करा.
- मादक पदार्थांचे सेवन टाळावे.
- त्राटक करून झाल्यावर डोळ्यावरून थंड पाण्याचा हात फिरवावा.
त्राटक आणि ध्यान यांचे नाते
Bindu Tratak Benefits त्राटक ही ध्यानाची पूर्वतयारी मानली जाते. मनाला एका बिंदूवर स्थिर ठेवण्याची सवय लागल्यावर ध्यान, धारणा अधिक सुलभ होते. त्यामुळे योगमार्गावर प्रगती करू इच्छिणाऱ्यांसाठी त्राटक अत्यंत उपयुक्त आहे.
Bindu Tratak Benefits
त्राटक ही केवळ डोळ्यांची व्यायामपद्धती नाही, तर ती मनशुद्धी, एकाग्रता आणि आत्मजागृतीसाठी प्रभावी साधना आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने केल्यास त्राटक मनाला निर्विचार स्थितीकडे नेते.
शांत, संयमित आणि मार्गदर्शनाखाली ही साधना केल्यास तिचे लाभ निश्चितच अनुभवता येतात. योगमार्गावर प्रगती करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने त्राटकाचा अभ्यास अवश्य करावा.
Table of Contents