Bhramari Pranayama| मानसिक शांततेसाठी “भ्रामरी प्राणायाम” योग्य पद्धतीने कसा करावा? जाणून घ्या इथे.

Bhramari Pranayama: योगामधील प्राणायाम हा केवळ श्वास घेण्याच्या आणि सोडण्याचा व्यायाम नसून, तो शरीर आणि मन यांच्यातील एक महत्वाचा सेतु मानला जातो. योग्य पद्धतीने केलेला प्राणायाम आपल्या मज्जासंस्थेवर, फुप्फूसावर, मेंदूवर आणि मानसिक आरोग्यावर खोल परिणाम करतो.

अशाच प्रभावी प्रणायमापैकी एक प्राणायाम म्हणजे भ्रामरी प्राणायाम आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तनाव, चिंता, चिडचिड, झोपेच्या तक्रारी आणि एकाग्रतेचा अभाव या समस्या. सर्वसामान्य झाल्या आहेत. आशा वेळी भ्रामरी प्राणायाम ही एक सोपी, प्रभावी आणि सुरक्षित साधन ठरते.

भ्रामरी प्राणायाम ही मधमाशीप्रमाणे गुंजन करणाऱ्या आवाजावर आधारित एक प्रसिद्ध प्राणायाम पद्धत आहे. जगभरातील अनेक लोक हा प्राणायाम फक्त श्वास घेणे, गुंजन करणे, आणि आराम करणे इतक्यापूरताच करतात. मात्र ही भ्रामरी प्रणायमाची केवळ एक लहान बाजू आहे.

प्रत्यक्षात भ्रामरी प्राणायाम ही एक संपूर्ण प्रणाली आहे ज्यामध्ये योग्य बैठक, श्वसन नियंत्रण, हातांची विशिष्ट ठेवन आणि आत्म केंद्रित जागरूकता यांचा समावेश होतो

भ्रामरी प्राणायाम म्हणजे काय?

भ्रामरी हा शब्द संस्कृतमधील ‘भ्रमर’ या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ ‘भुंगा'(मधमाशी) असा होतो. या प्रणायमात श्वास सोडताना मधमाशीप्रमाणे हंmmmm किंवा मंmmmm असा गुंजनासारखा आवाज निर्माण केला जातो. त्यामुळे याला Humming Bee Breath असेही म्हणाले जाते.

Bhramari Pranayama
Bhramari Pranayama

हा Bhramari Pranayama हिमालयातील योगपरंपरेतून आलेला असून, केवळ आवाज काढणे एवढाच त्याचा उद्देश नाही. योग्य बैठक, नियंत्रित श्वसन, हातांची विशिष्ट स्थिति (मुद्रा) आणि अंतर्मुख एकाग्रता- या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे भ्रामरी प्राणायाम.

या Bhramari Pranayama मध्ये बैठक, श्वसन, हाताच्या हालचाली आणि आवाज यांचा अत्यंत काळजीपूर्वक समन्वय केला जातो. ही सर्वसमावेशक पद्धत भ्रामरी प्राणायाम अधिक प्रभावी बनवते आणि मन व मज्जासंस्थेवर त्याचा परिणाम वाढवते. या घटकांची योग्य समज असल्यास मानसिक स्पष्टता सहज साधता येते.

भ्रामरी प्रणायमाचा उद्देश काय आहे?

भ्रामरी प्रणायम जीवनात संतुलन आणण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. यासाठी आपल्या सोबत योगतज्ञ असणे आवश्यक आहे. आधुनिक जीवनातील तान, तणाव, चिंता आणि मानसिक थकवा अनुभवणाऱ्य प्रत्येकासाठी ही साधना उपयुक्त आहे.

Bhramari Pranayama तज्ञांच्या मते: नियमित भ्रामरी प्राणायाम केल्याने विचारशक्ती सुधारते, भावना नियंत्रित राहतात आणि तणाव कमी होतात.

विदयार्थी, नोकरी करणारे, व्यावसायिक किंवा निवृत्त व्यक्ति आशा सर्वांसाठी भ्रामरी प्राणायाम मानसिक स्पष्टता मिळवण्याचा एक सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे.

नियमित सरावामुळे एकाग्रता वाढते, निर्णयक्षमता सुधारते आणि मनातील गोंधळ कमी होतो. रोजच्या जीवनात भ्रामरी प्रणायमाचा समावेश केल्यास आपण वर्तमान क्षणात अधिक सजगपणे जगू शकतो.

भ्रामरी प्राणायाम योग्य पद्धतीने कसा करावा

सुखासन, पद्मासन किंवा वज्रासन आशा कोणत्याही एका आसनात आरामात बसा किंवा खुर्चीवर सरळ बसा. पाठ ताठ ठेवा, मान सरळ ठेवा आणि खांदे पूर्णपणे सैल सोडा. मान समोर ठेवा. शरीर स्थिर आणि आरामदायक स्थितीत असणे महत्त्वाचे आहे.

Read Also  Chandrabhedan Pranayam |मानसिक शांतता आणि शरीराला थंडावा देणारा प्रभावी योगाभ्यास; जाणून घ्या चंद्रभेदन प्राणायाम काय आहे.

बैठक आणि श्वसन निश्चित झाल्यानंतर हातांची योग्य ठेवन महत्त्वाची ठरते. हिमालयीन पद्धतीनुसार प्रत्येक बोटाची विशिष्ट भूमिका असते आणि ती स्थिति ऊर्जा योग्य दिशेने प्रवाहित करण्यास मदत करते

हातांची योग्य ठेवण Bhramari Pranayama

  1. दोन्ही हाताचे अंगठे कानाच्या पोकळीत हलके दाबून ठेवा, यामुळे बाहेरील आवाज कमी होतो आणि अंतर्मुख होता येते.
  2. दोन्ही हाताच्या करंगळी नाकाच्या खाली ठेवा, श्वसन संतुलित ठेवण्यास मदत होते.
  3. मधले बोट व अनामिका बोट डोळ्यांच्या आतील कोपऱ्यावर ठेवा, चेहऱ्यावरील ताण कमी होतो.
  4. तर्जनी भुवयांच्या मध्यभागी (आज्ञाचक्र/ तिसरा डोळा) ठेऊन लक्ष केंद्रित करा; एकाग्रता आणि स्पष्टता वाढते.
  5. हात योग्य स्थितीत असतील तर गुंजनात निर्माण होणारी कंपन शक्ती अधिक खोलवर शरीरात पोहोचते.

श्वसन: तोंड बंद ठेवा आणि नाकावाटे हळू, खोल आणि शांत श्वास घ्या. Bhramari Pranayama

गुंजन (हम्मिंग): श्वास हळूहळू सोडत सोडत, ओठ बंद करून मधमाशीप्रमाणे सतत, स्थिर आणि खोल आवाजात “हंmmmm किंवा मंmmmm” असा गुंजनाचा आवाज करा.

कंपनावर लक्ष केंद्रित करा: निर्माण होणाऱ्या आवाजावर आणि डोके व छातीत जाणवणाऱ्या कंपनांवर पूर्ण लक्ष द्या. मन इतर विचारांपासून दूर ठेवा आणि पुनः श्वास घ्या.

पुनरावृत्ती: ही प्रक्रिया ३ ते १० वेळा करा. शक्य तितक्या आरामदायक पद्धतीने श्वास सोडण्याचा कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करा.

भ्रामरी प्राणायमात श्वसन ही मुख्य दिशा देणारी प्रक्रिया आहे. नाकावाटे हळू, खोल आणि नियंत्रित श्वास घ्या. श्वास घेताना मनात शांतता आणि स्थैर्याची भावना ठेवा. जणू आजूबाजूच्या वातावरणातून शांतता आत घेत आहात. श्वास सोडताना तोंड बंद ठेवून दीर्घ, मृदू आणि सातत्यपूर्ण गुंजनाचा आवाज काढा.

महत्त्वाच्या सूचना व काळजी

  1. जास्त दाब टाळा: कान, डोळे किंवा चेहऱ्यावर जास्त दाब देऊ नका. डोळ्यांच्या गोळ्यांवर कधीही दाब लागू देऊ नका.
  2. योग्य बैठक: संपूर्ण सरावादरम्यान पाठ सरळ ठेवा. चुकीची बैठक प्राणायामाचा परिणाम कमी करू शकते.
  3. कोणी टाळावा: कानाचा संसर्ग (Ear Infection) असल्यास, उच्च रक्तदाब (High Blood Pressure) असल्यास, अपस्मार (Epilepsy) असल्यास भ्रामरी प्राणायाम टाळावा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
  4. योग्य वेळ: भ्रामरी प्राणायाम सकाळी किंवा संध्याकाळी, शक्यतो रिकाम्या पोटी करणे अधिक फायदेशीर ठरते.

भ्रामरी प्राणायामाचा केंद्रबिंदू म्हणजे आवाज. हा प्राणायाम अत्यंत शांत असून त्यातील गुंजन लवकरच मन शांत करते. हा आवाज डोक्यात कंपने निर्माण करतो, जे मेंदूसाठी नैसर्गिक मालिश सारखे कार्य करतात. श्वसनाचा ठराविक लयबद्धपणा मज्जासंस्थेला शांत करतो. तो झोप आणू देत नाही आणि अस्वस्थता वाढू देत नाही.

Bhramari Pranayama श्वास हा या साधनेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. योग्य श्वसनामुळे मन शांत होते आणि आवाज अधिक सुरेल व प्रभावी बनतो. भ्रामरी प्राणायाम झाल्यानंतर काही क्षण शांत बसणे अत्यंत आवश्यक आहे. हात सोडून डोळे बंद ठेवा आणि शरीरावर होणारे परिणाम जाणवू द्या. सुरुवातीला पाच मिनिटे भ्रामरी प्राणायाम करा नंतर हळूहळू वेळ वाढवत 15 मिनिटे किंवा त्याहून अधिक सराव करा.

Read Also  Tadasana Yoga pose: योगामध्ये ताडासन कसे करावे? योग्य पवित्रा, प्रकार आणि सामान्य चुका समजून घ्या.

भ्रामरी प्राणायामाचे पाच महत्त्वाचे फायदे

नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते: वैज्ञानिक संशोधनानुसार भ्रामरी प्राणायाम करताना निर्माण होणाऱ्या गुंजनामुळे, नाकातील नायट्रिक ऑक्साईड चे उत्पादन साध्या शोषणाच्या तुलनेत 15 पट वाढते. नायट्रिक ऑक्साईड हे रक्तवाहिन्यांना रुंद करणारा घटक आहे. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. ऑक्सिजन पेशीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचतो आणि हृदय व श्वसन संस्थेचे आरोग्य सुधारते.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते: नायट्रिक ऑक्साईड हे नैसर्गिक जंतुनाशक आणि विषाणू नाशक घटक आहे. हे शरीरातील दाह कमी करते आणि बॅक्टेरिया, व्हायरस, बुरशी व इतर सूक्ष्म जंतुविरुद्ध लढण्यास मदत करते. नियमित भ्रामरी प्राणायामामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे वारंवार होणारे सर्दी खोकला संसर्गजन्य आजार यांचा धोका कमी होऊ शकतो.

तणाव चिंता कमी होऊन मन शांत होते: भ्रामरी प्राणायमातील गुंजनाचा आवाज पॅरासिंथेटीक नर्व्हस सिस्टीम सक्रिय करतो, जी शरीराला विश्रांती आणि पुनर्बांधणी अवस्थेत नेते. त्यामुळे हृदयाचे ठोके कमी होतात. रक्तदाब नियंत्रित राहतो आणि मनातील नकारात्मक विचार शांत होतात. नियमित सरावामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते, तसेच सेरोटोनिन आणि डोपामिनसारखे “हॅपी हार्मोन्स” वाढण्यास मदत होते.

Bhramari Pranayama
Bhramari Pranayama

श्वसन संस्था आणि सायनस चे आरोग्य सुधारते: भ्रामरीमुळे निर्माण होणाऱ्या कंपनामुळे सायनसच्या पोकळ्या स्वच्छ होण्यास मदत होते. कफ साचणे, नाक बंद होणे, एलर्जी, सायनसचा त्रास यामध्ये आराम मिळतो. फुफुसांची कार्यक्षमता वाढते. श्वासोच्छ्वास अधिक सुलभ होतो आणि श्वसन संस्था मजबूत होते.

हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी चालना: भ्रामरी प्राणायामामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात ज्यामुळे मेंदूला अधिक रक्तपुरवठा होतो. यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता, निर्णय क्षमता सुधारते संशोधनुसार या प्राणायामामुळे मेंदूमध्ये गामा ब्रेन व्यवस्था सक्रिय होतात, ज्या उच्च स्तरावरील विचारशक्ती आणि मानसिक स्पष्टतेशी संबंधित असतात.

Bhramari Pranayama

भ्रामरी प्राणायाम ही एक सोपी पण अत्यंत प्रभावी योगसाधन आहे. कोणतीही खर्चिक साधन न लागता फक्त काही मिनिटात ती मन, मेंदू आणि शरीरावर सकारात्मक परिणाम करते. रोजच्या जीवनातभ्रामरी प्राणायामाचा समावेश केल्यास मानसिक, शांतता, आरोग्यदायी श्वसन आणि संतुलित जीवन शैली साध्य होऊ शकते.

WhatsApp Group join link Join Now

Leave a Comment