Bhastrika Pranayam|भस्त्रिका प्राणायाम म्हणजे काय? करण्याची योग्य पद्धत आणि फायदे, दक्षता आणि शास्त्रीय माहिती समजून घ्या.

Bhastrika Pranayam: भस्त्रिका प्राणायाम हा हठयोगातील अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली प्राणायाम मानला जातो. ‘भस्त्र’ म्हणजे लोहाराचा भाता. त्याची छोटी अवस्था म्हणजेच ‘भस्त्रिका’ लोहाराचा भाता ज्या वेगाने हवा आत खेचतो आणि तीच हवा बाहेर सोडतो, अशाच पद्धतीच्या या तंत्राचा उपयोग या प्राणायमात केलेला आहे. सुरुवातीस याच पद्धतीने पूरक व रेचक करायला सांगितले आहे व त्यानंतर सूर्यभेदन प्राणायमाचे एक आवर्तन आपनास करायचे आहे.

या भस्त्रिका प्राणायमात (Bhastrika Pranayam) श्वास सोडण्याची प्रक्रिया अधिक वेगाने आणि जोरात होते, तर श्वास घेणे तुलनेने नैसर्गिक व थोडे हळूहळू होते. या जलद श्वसनामुळे शरीरातील साचलेली अशुद्ध हवा, कफ आणि विषारी घटक बाहेर टाकले जातात त्यामुळे शरीरातील प्राणशक्ती जागृत होते आणि संपूर्ण शरीरात ऊर्जा निर्माण होते.

भस्त्रिका प्राणायामचा शास्त्रीय आधार

हठप्रदीपिका आणि घेरंडसंहित या प्राचीन योग ग्रंथामध्ये भस्त्रिका प्रणायमाचे महत्व अत्यंत सुलभ पद्धतीने स्पष्ट केले आहे. या ग्रंथानुसार ‘भस्त्रीका प्राणायाम’ केल्याने वातपित्त आणि कफ या त्रिदोषांचे संतुलन आपल्या शरीरामद्धे राखले जाते. या मुळे शरीरातील अग्नि तत्व सक्रिय होतो आणि पचनक्रिया सुधारते, अन्नाचे योग्य पचन होते.

नियमित अभ्यास केल्यामुळे शरीरातील संपूर्ण नाड्या शुद्ध होतात. रक्ताभिसरण सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते, म्हणूनच भस्त्रिका प्राणायामाला योगातील शक्तीवर्धक प्राणायाम असे म्हटले जाते.

ग्रंथअंतर्गत संदर्भ

संम्यक पदमासन बदध्वा समग्रीवोदंर सुधी:। मुख संयम्य यत्नेन प्राण घ्राणेन रेचयेत।।ह.प्र ६०।। यथा लगति हत्कण्ठे कपालावधि सत्वनम। वेगेन पुरयेच्चापि हत्वमावधि मारुतम।।ह.प्र .६१।। पुनर्विरेचयेत्त्तद्वव्त पुरयेच्च पुन:पुन। यर्थेव लोहकारेण भस्त्रा वेगेन चालयेत। तर्थेव स्वशरीरस्य चालयेत पवन धिया।।।ह.प्र .६२।। यदा श्रमो भवदेहे तदा सूर्येण पूरयेत।।ह.प्र .६३।।

भस्त्रिका प्राणायाम करण्याची योग्य कृती

भस्त्रिका प्राणायाम करण्यासाठी पहाटेची वेळ अत्यंत चांगली असते. त्यासाठी रिकाम्या पोटी शांत व स्वच्छ ठिकाणी बसावे. यासाठी पद्मासन, सिद्धासन, साधी मांडी किंवा वज्रासन यापैकी कोणत्याही आरामदायक आसनात बसा. पाठीचा कणा सरळ, ताठ ठेवा. डोळे हलकेच बंद करा. चेहऱ्यावरील तान काढून टाका, मन शांत ठेवा, आपले संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रीत करा.

Bhastrika Pranayam
Bhastrika Pranayam

आता आपल्या दोन्ही नकपुड्यानी जलद गतीने श्वास (पूरक आणि रेचक) शरीरामधे घ्या आणि जोरात बाहेर सोडा. श्वास सोडत असताना आपले पोट आत ओढले जाते. त्यामुळे रेचक जोरात होतो आणि श्वास घेणे आपोआप व नैसर्गिकरित्या होते. ही क्रिया करताना श्वासाचा आवाज आला तर हा घशातून येऊ देऊ नये तर तो आवाज नाकातून येणे अपेक्षित आहे.

Read Also  Bharamari Pranayama|मानसिक शांततेसाठी "भ्रामरी प्राणायाम" योग्य पद्धतीने कसा करावा? जाणून घ्या इथे.

सुरुवातीच्या अभ्यासात पंधरा-वीस आवर्तन करून काही वेळ थांबावे आणि पुनः सुरुवात करावी. हा सराव वाढल्यानंतर तीस- चाळीस आवर्तने करण्यास काही हरकत नाही. हा Bhastrika Pranayam करत असताना थकवा जाणवला तर श्वसन थांबवावे आणि थोडा वेळ नैसर्गिक श्वसन करत तसेच बसावे.

सूर्य भेदन प्राणायामासह भस्त्रिका कशी करावी?

भस्त्रिका प्राणायामानंतर सूर्य भेदन प्राणायामाचे एक आवर्तन करणे आवश्यक मानले जाते. यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रण राहते. सूर्य भेदन प्राणायाम करण्यासाठी आपली डावी नाकपुडी प्रणवमुद्रेने बंद करून फक्त आपल्या उजव्या नाकपुडीने हळूहळू खोल श्वास घ्या आणि नंतर दोन्ही नाकपुड्या बंद करून जालंधरबंध, मूलबंध आणि उड्डियानबंध लावा, शक्य तितका वेळ श्वास रोखून (कुंभक) ठेवा.

यानंतर सर्व बंध सोडत उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने हळूहळू श्वास बाहेर सोडा. ही प्रक्रिया एकदा पूर्ण केल्यावर भस्त्रिका प्राणायामाचे संपूर्ण आवर्तन पूर्ण होते.

भस्त्रिका प्राणायामाचे आरोग्यदायी फायदे.

हठप्रदीपिकेतील भस्त्रिका प्राणायामामुळे शरीरातील वात, पित्त, कफ या त्रिदोषाचे संतुलन साधण्यास मदत होते. शरीरातील अग्नीचे संवर्धन करणारा हा प्राणायाम आहे. तसेच शरीरातील सर्व नाडयानची शुद्धी करणारा व शक्तीचे जाणीव करून देणारा हा प्राणायाम आहे.

भस्त्रिका प्राणायामामुळे फुफुसांची कार्यक्षमता वाढते. हा प्राणायाम उष्ण असल्याने श्वसन संस्थेचे विकार जसे सर्दी, खोकला, दमा, spondilaysisराणायामामुळे फुफुसांची कार्यक्षमता वाढते. हा प्राणायाम उष्ण असल्याने श्वसन संस्थेचे विकार जसे सर्दी, खोकला, दमा, स्पॉण्डिलायसिस, सायटिका यामध्ये मोठा लाभ होतो. पचनशक्ती वाढते त्यामुळे गॅस, अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या कमी होतात.

शरीरात ऊर्जा, स्फूर्ती आणि कार्यक्षमता वाढते मानसिक दृष्ट्या हा प्राणायाम अत्यंत उपयुक्त आहे. तणाव, चिंता निराशा कमी होऊन मन शांत होते. भस्त्रिका प्राणायामाचा नियमित अभ्यास केल्यामुळे एकाग्रता वाढते आणि आत्मविश्वासात सुधारणा होते.

भस्त्रिका प्राणायाम करताना घ्यावयाची दक्षता

Bhastrika Pranayam हा उष्ण स्वरूपाचा असल्यामुळे तो मर्यादितच करणे आवश्यक आहे. सुरुवातीला कमी आवर्तनापासून सुरुवात करावी श्वासावर जबरदस्ती करू नये. हा प्राणायाम नेहमी रिकाम्या पोटी करावा. अती थकवा, चक्कर किंवा अस्वस्थता वाटल्यास लगेच थांबावे. शक्य असल्यास अनुभवी योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा प्राणायाम करणे अधिक सुरक्षित ठरते.

Read Also  Yoga Benefits in Marathi: धावपळीच्या जीवनात योग का आवश्यक आहे? काय आहे निरोगी जीवनाची गुरुकिल्ली, जाणून घ्या!

भस्त्रिका प्राणायाम कोणासाठी उपयुक्त आहे?

Bhastrika Pranayam ज्या व्यक्तिना सर्दी, दमा, कफ विकार, पचनाच्या तक्रारी थकवा आळस आणि अनामिक मानसिक तणाव आहे आशा व्यक्तींना भस्त्रिका प्राणायाम विशेष उपयुक्त ठरतो. नियमित योगाभ्यास करणारे किंवा आपल्या शरीराची क्षमता वाढवू इच्छिणारे तसेच ध्यान धारणा आणि प्राणायामत आणखी प्रगती करू इच्छिणारी व्यक्ती हा प्राणायाम करू शकतात.

भस्त्रिका प्राणायाम कोणी करू नये

उच्च रक्तदाब, हृदयरोग, अल्सर, मेंदूचा ट्यूमर, गंभीर पोटांचे आजार असलेल्या व्यक्तींनी हा Bhastrika Pranayam टाळावा. गर्भवती असणाऱ्या महिलांनी हा प्राणायाम करू नये. तसेच पोटाची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीनी हा भस्त्रिका प्राणायाम करू नये. कडक उन्हाळ्यात किंवा शरीरात अति उष्णता असल्यास हा प्राणायाम टाळणे हितावह आहे.

Bhastrika Pranayam

भस्त्रिका प्राणायाम हा योगातील अत्यंत प्रभावी व ऊर्जावर्धक प्राणायाम आहे. लोहाराच्या भात्याप्रमाणे जलद श्वसन केल्यामुळे शरीरातील साचलेला कफ, विषारी घटक, नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकण्यास मदत होते. या प्राणायांमुळे श्वसन संस्था मजबूत होते. पचनशक्ती वाढते आणि शरीरात नवचैतन्य निर्माण होते.

नियमित आणि योग्य पद्धतीने भस्त्रिका प्राणायाम केल्यास मानसिक तणाव कमी होतो. एकाग्रता वाढते आणि मन शांत राहते. मात्र हा प्राणायांम उष्ण स्वरूपाचा असल्याने सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही. आरोग्याची स्थिती, वय आणि शारीरिक क्षमता लक्षात घेऊनच भस्त्रिका प्राणायाम करणे आवश्यक आहे.

विशेषता हृदयविकार, उच्च रक्तदाब किंवा गर्भावस्थेत असलेल्या व्यक्तीने तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. योग्य मार्गदर्शन, संयमी जीवनशैली, नियमित योगाभ्यास यांची सांगड घातल्यास भस्त्रिका प्राणायाम आरोग्यदायी संतुलित आणि सकारात्मक जीवन जगण्यासाठी नक्की उपयुक्त ठरतो.

WhatsApp Group join link Join Now

Leave a Comment