Jyoti Tratak Benefits: योगाभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी शरीरशुद्धीला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. प्राचीन योगग्रंथांमध्ये साधकाने शरीरातील दोष, मल आणि अशुद्धता दूर करूनच उच्च स्तरावरील साधना करावी असे स्पष्ट सांगितले आहे. ही शुद्धी साधण्यासाठी “षटकर्म” (Shatkarma) या सहा शुद्धीक्रिया सांगितल्या आहेत. त्यापैकी ज्योती त्राटक ही एक प्रभावी आणि सोपी शुद्धीक्रिया आहे.
त्राटक म्हणजे एखाद्या सूक्ष्म वस्तूकडे किंवा बिंदूकडे पापणी न हलवता एकटक पाहणे. ही क्रिया डोळ्यांची शुद्धी करण्याबरोबरच मनाला स्थिर व एकाग्र बनवते.
योगग्रंथांमधील त्राटकाचे वर्णन
हठयोग प्रदीपिका मध्ये त्राटकाचे वर्णन करताना सांगितले आहे की – “निरीक्षेन्नीश्चलदृश्या सूक्ष्म लक्षं समाहित:| अश्रुसंपातपर्यंतअन्तआचर्य स्त्राटाकं स्मृतम् ||” (अश्रू येईपर्यंत स्थिर दृष्टीने सूक्ष्म लक्ष्याकडे पाहणे म्हणजे त्राटक होय.
तसेच घेरंड संहिता मध्ये महर्षी घेरंड यांनी पापणी न लवता अश्रू येईपर्यंत लक्ष्याकडे पाहणे हाच त्राटकाचा खरा अर्थ असल्याचे स्पष्ट केले आहे. “निमेषोन्मेषक त्यकत्वा सूक्ष्म निरीक्षीत|पतन्ति यावदक्षुनि त्राटकं प्रोच्येते बुधै||”
Jyoti Tratak Benefits यावरून त्राटक ही केवळ दृष्टीची क्रिया नसून ती मनशुद्धी आणि अंतर्मन जागृत करण्याची प्रभावी साधना आहे हे लक्षात येते.
ज्योती त्राटक म्हणजे काय?
ज्योती त्राटक म्हणजे मेणबत्तीच्या ज्योतीकडे एकटक पाहणे. ही साधना प्रामुख्याने अंधाऱ्या खोलीत केली जाते. ज्योतीकडे एकटक पाहिल्याने चंचल मनावर नियंत्रण येते आणि मनाची एकाग्रता प्रचंड वाढते.
एकाच वस्तूकडे काही काळापर्यंत एकटक पाहणे म्हणजे त्राटक होय. चंचल मनाला आवर घालून मनाची एकाग्रता साधण्यासाठी त्राटक आणि ध्यान ही सर्वोत्तम मार्ग आहेत. त्राटक साधनेने मन निर्विचार होते त्यामुळे अंतर्मन व बाह्यमन एकरूप होण्यास मदत होते.
ज्योती त्राटक करण्याची योग्य पद्धत
- साधनेसाठी शांत आणि किंचित अंधारी खोली निवडा. खिडक्या-दरवाजे बंद ठेवा, जेणेकरून वारा येणार नाही. व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या.
- जमिनीवर चटई टाकून पद्मासन, सुखासन, साधी मांडी घालून बसा. आपल्या समोर दीड ते दोन फूट अंतरावर छोटा स्टूल ठेवून त्यावर मेणबत्ती पेटवा आणि मेंबत्तीच्या ज्योतीकडे एकटक पहा.
- जमिनीवर बसणे शक्य नसल्यास खुर्चीवर बसा. आपल्या पुढे सुमारे दीड ते दोन फूट अंतरावर स्टूल ठेवून त्यावर मेणबत्ती पेटवा.
- शरीर सैल सोडून, पाठीचा कणा सरळ ठेवा. कपाळावर ताण न आणता पूर्ण शांत बसा.
- आता मेणबत्तीच्या ज्योतीकडे अंदाजे १५–२० सेकंद एकटक पाहा. ज्योत थोडी हलत असली तरी चालेल. नंतर डोळे अलगद बंद करा.
- बंद डोळ्यांसमोर ज्योतीची प्रतिमा दिसेल. त्या प्रतिमेकडे लक्ष केंद्रित करा. प्रतिमा नाहीशी झाल्यावर पुन्हा डोळे उघडून ज्योतीकडे पाहा.
- हा क्रम २–३ वेळा करा. शेवटी शांतपणे आसनातून उठा.
कालावधी
Jyoti Tratak Benefits डोळ्यातून अश्रू येईपर्यंतचा कालावधी हा त्राटकाचा नैसर्गिक कालावधी मानला जातो. पण साधारणतः २–३ मिनिटांपेक्षा जास्त वेळ करणे आवश्यक नाही. डोळ्यामध्ये पाणी नाही आले तरी ताण येईपर्यंत करावा, ताण असह्य वाटल्यास त्वरित थांबा. एकूण सराव १५–२० मिनिटांपेक्षा अधिक करू नये.
ज्योती त्राटकाचे लाभ
त्राटक साधनेचे (Jyoti Tratak Benefits) बरेच फायदे आहेत अंतर्मनातील अतिन्द्रिय शक्ती विकसित होते. डोळ्यांची शुद्धी होते. डोळ्यांच्या स्नायूंना योग्य ताण मिळून रक्तपुरवठा वाढतो. मनाचा चंचलपणा कमी होतो. मनाची एकाग्रता जबरदस्त वाढते. दृष्टी अधिक तीक्ष्ण होते.
नजरेस एक प्रकारची धार येते. डोळ्यात चमक निर्माण होते. डोळ्यांच्या भिंगाची कार्यक्षमता वाढल्याने चष्मा असेल तर नंबर कमी होऊन (नियमित सरावाने) कायमचा निघून जातो. मानसिक तणाव कमी होतो. ध्यानसाधनेसाठी मन स्थिर बनते.
घ्यावयाची काळजी
Jyoti Tratak Benefits दृष्टीदोष किंवा तीव्र डोकेदुखी असणाऱ्यांनी तज्ञ मार्गदर्शनाखालीच सराव करावा. चष्मा वापरणाऱ्यांनी चष्मा काढून त्राटक करावे. दीर्घकाळ डोळ्यांवर ताण देऊ नये. मानसिक विकार असणाऱ्यांनी ही साधना टाळावी. त्राटकानंतर डोळ्यांवर थंड पाण्याचे शिंतोडे मारावेत. मादक पदार्थांचे सेवन करून कधीही साधना करू नये.
मन एकाग्र करण्यासाठी सर्वोत्तम साधना
त्राटक आणि ध्यान या दोन्ही साधना मनाला स्थिर, शांत आणि निर्विचार बनवतात. चंचल मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अंतर्मनाशी एकरूप होण्यासाठी ज्योती त्राटक अत्यंत प्रभावी आहे. नियमित आणि संयमित सराव केल्यास व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल दिसून येतात.
Jyoti Tratak Benefits
ज्योती त्राटक ही साधी परंतु अत्यंत प्रभावी योगशुद्धी क्रिया आहे. ती केवळ डोळ्यांच्या आरोग्यासाठीच नव्हे तर मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि आत्मशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. मात्र, योग्य पद्धतीने आणि मर्यादित कालावधीतच ही साधना करणे आवश्यक आहे. नियमित सराव, संयम आणि शिस्त यामुळेच त्राटकाचा खरा लाभ मिळतो.
Table of Contents